बाबांच्या पाठिंब्यासाठी अमेरिकेतही उपोषणाला बसणार

June 4, 2011 10:59 AM0 commentsViews: 1

04 जून

एकीकडे बाबा रामदेव यांचं आंदोलन वादात सापडलं आहे. पण त्यांना मोठा पाठिंबाही मिळत आहे. बाबांच्या उपोषणासाठी देशभरातून नवी दिल्लीत हजारो लोक दाखल झाले आहे. तर अमेरिकेतील भारतीय या आंदोलनात सहभागी होत आहेत.

याविषयी अमेरिकेत बैठका सुरू आहेत. अमेरिकेच्या किमान 13 शहरांमध्ये भारतीय नागरिक उपोषणाला बसणार आहेत. आज अनेक राज्यांमध्येही त्यांचे समर्थक उपोषणाला बसले आहेत. कोलकत्ता आणि भोपाळमध्येही बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक उपोषणाला बसले आहे. भ्रष्टाचारविरोधी अभियानात सामील झाले आहे.

close