सलमानचं कॅरेक्टर ढिला तरीही ढिंक चिका..

June 4, 2011 12:02 PM0 commentsViews: 3

04 जून

बॉलिवूडमध्ये खूप कमी ऍक्टर्स आहेत ज्यांनी आपलं बॉक्स ऑफिस जास्तीत जास्त हिट ठेवलं आहे. त्यापैकीच एक सलमान खान. अर्थातच यात त्याच्या प्रेक्षकांचा वाटा आहे. पण खारीचा वाटा आहे तो त्याच्या डान्स नंबर्सचा.

अगदी अलिकडचंच बोलायचं झालं तर वाँटेडमधला त्याचा जलवा सगळ्यांनीच पाहिला. इतकचं नाही तर दबंगमधल्या मुन्नीला त्याने जितकं हिट केलं तितकाचं त्याचा दबंगही दाखवून दिला. आणि आता तर कॅरेक्टर ढिलामुळे त्याचे फॅन्स ढिंक चिका ढिंक चिका करताना थिरकत आहे.

सलमानची वाँटेडमधली कॉलर लिफ्ट स्टेप लोकप्रिय झाली. कोरिओग्राफर प्रभू देवाची ती करामत होती. वाँटेडमधला हा डान्स जसा पॉप्युलर झाला तसाच दबंगमधलाही. आणि आता रेडीमधली स्टेपही वेगळी ठरलीय. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे.

सलमानच्या या नव्या ट्रॅकचा कोरिओग्राफर आहे मुद्दसर खान. सलमानची गाणी सल्लूमियाँची इमेज समोर ठेवूनच बनवली जातात. सध्या सलामानच्या या अदाकारी पाहून कुणीच त्याला टक्कर देऊ शकणार नाही, हे नक्की.

close