कोकणासह राज्यात पावसाची दमदार हजेरी

June 4, 2011 3:27 PM0 commentsViews: 2

04 जून

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणार्‍या कोकणात अखेर वरूण राजाचे आगमन झाले आहे. किनारपट्टीवर मच्छीमारांची मात्र चांगलीच धावपळ झाली. मान्सूनचं 7 ते 10 जून पर्यंत कोकणात दाखल होणार अशी शक्यता वेध शाळेकडून वर्तवण्यात आली होती.

वरूण राजाचे आगमन होणार म्हणून समुद्रही चांगलाच खवळला होता. यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किनारपट्टीशी बांधण्यास सुरूवात केली. मात्र झालेल्या पावसाने एकच धावपळ उडाली.

मात्र वरूणराजाच्या आगमनामुळे कोकणासह राज्यातला शेतकरी राजा आनंदी झाला आहे. कोकणकरांनी चिंब भिजून वरूणराजाचं स्वागत केलं आहे.

तर मुंबई आणि उपनगरात आज पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या काहिलीपासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पावसानं दुसर्‍या दिवशीही गारवा देऊ केला.

तसेच पुणे, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसाने रस्त्यांवर पाणी साचलं. तर खेडमध्ये मुसळधार पावसासोबतच प्रचंड वारा असल्याने खेडला झाडंही उन्मळून पडली आहे.

close