संभाजी ब्रिगेडच्या तावडीतून वाघ्या सुटला

June 4, 2011 3:46 PM0 commentsViews: 3

04 जून

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठीचं संभाजी ब्रिगेडचं अखेर आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने 6 जून रोजी आंदोलनाची घोषणा केली होती. यासंबंधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी याबद्दल समिती नेमण्याचे आश्वासन दिलं आहे.

या आश्वासनानंतर राज्याभिषेकासाठी इथं येणार्‍या लोकांना या आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित केल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं आहे. पण आपल्या आणखी काही मागण्या यावेळी गायकवाड यांनी सरकारकडे केल्या आहे.

6 जून हा शिवराज्याभिषेक दिन, राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा, राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास या नाटकावर बंदी घालावी सरकारनं गडकरींचं जे समग्र साहित्य प्रकाशित केलं आहे त्यावर बंदी घालावी आणि पुण्यातल्या संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवण्याची मागणीही यावेळी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

close