लाठीचार्ज झाला नाही दिल्ली पोलिसांचा खुलासा

June 5, 2011 8:39 AM0 commentsViews: 2

05 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनाची परवानगी रद्द करण्यात आली हे सांगण्यासाठी पोलीस अधिकारी स्टेजवर गेले असता बाबांनी आपल्या समर्थकांकडे पळण्याचा प्रयत्न केला यामुळेच मैदानात एकच धावपळ सुरू झाली यावेळी कोणावरही लाठीमार करण्यात आली नाही तसेच महिलांवर अत्याचार केला नाही असा खुलासा दिल्ली पोलीस स्पेशल सीपी धमेंद्र कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

उलट मैदानावर बाबांनी स्टेजवरून खाली उतरले तेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दिशाने फर्नीचर, दगड फेकली कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला पण तो बचाव करण्यासाठीच केला आहे. यावेळी सर्व मीडिया हजर होता त्यांच्यासमोरच ही कारवाई केली आहे असा खुलासा ही धमेंद्र कुमार यांनी केला.

close