कॅप्टन महेंद्रसिंग धोणीची विजयी सलामी

November 11, 2008 6:21 PM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर नागपूरऑस्ट्रेलियाविरुध्दच्या या विजयानं भारतीय टेस्ट क्रिकेटला एक नवा चेहरा मिळालाय भारतीय टेस्ट टीमची धुरा वाहणा-या कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं विजयी सलामी दिली. वनडे टीमचा हा यशस्वी कॅप्टन आता टेस्ट टीमसाठीही लकी ठरू लागलाय. भारताच्या टेस्ट इतिहासात आजवर अनेक कॅप्टन होऊन गेले. मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनिल गावसकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी आपापल्या काळात भारतीय क्रिकेट गाजवलं. पण आता या दिग्गजांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात एका नव्या पर्वाला सुरुवात झालीय, महेंद्रसिंग धोणीच्या रूपानं. भारतीय वन डे टीमचा यशस्वी ठरलेला हा कॅप्टन आता टेस्टमध्येही भारतासाठी लकी ठरू लागलाय. अनिल कुंबळेनंतर कप्तानपदाची धुरा सांभाळणा-या धोणीनं बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत नागपूर टेस्ट तर जिंकलीच, शिवाय बॉर्डर गावसकर सिरीजवरही आपलं नाव कोरलं. नागपूरमधल्या या विजयानं भारतानं आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीतही दक्षिण आफ्रिकेला मागे ढकलत दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. असं असलं तरी महेंद्रसिंग धोणीचं लक्ष असेल ते यापुढची प्रत्येक टेस्ट मॅच जिंकून देत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचं.

close