पैशांच्या गैरव्यवहारांवरून अमिताभ बच्चनला नोटीस

June 4, 2011 4:40 PM0 commentsViews: 1

04 जून

एका घोटाळ्याप्रकरणी इन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं म्हणजेच ईडीनं अमिताभ बच्चनला नोटिस बजावली आहे. याचप्रकरणी अमर सिंहविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ईडी सहा फ्रॉड कंपन्यांविरोधात तपास करत आहे. या कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन मेजर शेअर होल्डर आहे.

शिवाय अमर सिंह आणि त्यांची पत्नी पंकजा यांचेही या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. अलाहाबाद हाई कोर्टाने याप्रकरणी ईडीला महिनाभरात स्टेटस रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ईडीनं अमिताभ बच्चन आणि अमर सिंह यांची पत्नी पंकजा यांना नोटिस पाठवली आहे.

close