यंग ब्रिगेडची विजयी सलामी

June 4, 2011 5:45 PM0 commentsViews: 2

04 जून

दुखापतग्रस्त जेष्ठांच्या अनुउपस्थित विंडीज दौर्‍यावर आलेल्या यंग ब्रिगेडने शानदार विजयी सलामी दिली आहे. टी-20 मॅचमध्ये भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 16 रन्सने पराभव करत शानदार विजय मिळवला आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने विजयासाठी वेस्टइंडिजसमोर 160 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. एस बद्रीनाथने भारतातर्फे सर्वाधिक 43 रन्स केले. याला उत्तर देताना विंडीजची सुरुवातच खराब झाली. अँद्रे फ्लेचर आणि सिमॉन्सने विंडीजच्या इनिंगची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 22 रन्स केले.

पण आर अश्विनने सिमॉन्सला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पाठोपाठ मुनाफ पटेलनंही फ्लेचरला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यानंतर डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअलनं विंडीजची इनिंग सावरली. या जोडीने 66 रन्सची पार्टनरशिप केली पण त्यांना रन्सचा ऍव्हरेज मात्र राखता आला नाही.

हरभजन सिंगने या दोघांची विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवटच्या ओव्हरमध्ये बार्नवेलनं फटकेबाजी करत मॅचमध्ये रंगत निर्माण केली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. विंडीजला 5 विकेट गमावत 143 रन्स करता आले. आता भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान 6 जूनला पहिली वन डे मॅच खेळवली जाईल.

close