लोकपाल समितीच्या बैठकीचे व्हिडिओ शूटिंग करा !

June 5, 2011 1:09 PM0 commentsViews: 2

05 जून

बाबा रामदेव यांच्यावर सरकारने केलेल्या कारवाईनंतर लोकपाल मसुदा समितीतले सामाजिक कार्यकर्ते सावध झाले आहे. लोकपाल समितीच्या संयुक्त मसुदा समितीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत सशर्त सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

बैठकीचं व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा केली आहे. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, स्वामी अग्निवेष, शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांची महाराष्ट्रात सदनात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

close