आंदोलनावर कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी – नितीन गडकरी

June 5, 2011 10:57 AM0 commentsViews: 3

05 जूनबाबा रामदेव यांच्यावर केली कारवाई ही सरकारचं लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याची सडकून टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन गडकरी यांनी केली आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज संध्याकाळी 7 पासून भाजप करणार सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांनी कालपासून उपोषणाला सुरूवात केली. काल संध्याकाळी कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन बाबांच्या सर्व मागण्या मान्य आहे त्यासाठी त्यांनी लेखी पत्र ही देण्यात येईल असं आश्वासन ही दिलं आणि बाबा एक दिवसाचं उपोषण करणार होते असं बाबांनी लिहून दिलेलं लेखीपत्र मीडियासमोर सादर केलं होतं. तर बाबांनी कपिल सिब्बल यांनी आपल्याला फसवलं असा आरोप कर यापुढे सिब्बल यांच्याशी चर्चा करायची नाही असं जाहीर केलं. बाबा आणि सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाची फेरी संपत नाही ते सरकारने मध्यरात्री बाबांच्या आंदोलनावर कारवाई केली.

close