‘रामलीला’वर महाभारताचा सेलिब्रिटींचा ट्विटरवर निषेध

June 5, 2011 3:26 PM0 commentsViews:

05 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनात सहभागी होणासाठी अनेक सेलिब्रिटींनी नकार दर्शवला होता. नुसता नकार नाही तर शाहरूख खान, सलमान खान यांनी समोर येऊन याचा खुलासा ही केला होता. मात्र काल मध्यरात्री रामलीलावरच्या या महाभारताबद्दल सेलिब्रिटींनीही सरकारच्या या दडपशाहीचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला निषेध व्यक्त केला आहे.

अनुपम खेर – पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा रामलीला मैदानावरच्या सर्वसामान्य लोकांशी ज्याप्रकारे वागली, ते पाहणं धक्कादायक आहे. हा प्रकार अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे….SHAME…

शेखर कपूर -आता दोन प्रश्नं विचारण्याची वेळ आली, एकतर पोलीस यंत्रणा ही लोकांसाठी काम करते की सरकारसाठी…जर ती सरकारसाठी असेल तर मग लोकांनी कोणाकडे पहावं.

राम गोपाल वर्मा – या अनुभवावरुन एक सत्य समोर आलं की बाबांसारख्या व्यक्तींशीही धोका होऊ शकतो.

close