रामलीलावर कारवाईबाबत कोर्टाने फटकारले

June 6, 2011 9:34 AM0 commentsViews: 2

06 जून

सुप्रीम कोर्टाने केंद्रीय गृहसचिव दिल्ली पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. शनिवारी मध्यरात्री रामलीला मैदानावर झालेल्या पोलिसी कारवाईची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सु-मोटो दाखल करुन घेतला आहे.

जस्टीस स्वतंत्र कुमार आणि जस्टीस बी.एस. चौहान यांच्या खंडापीठाने हा सु-मोटो दाखल करुन घेतला आहे. सप्रीम कोर्टाने केंद्र आणि दिल्ली पोलिसांना या नोटिशीला 2 आठवड्यात उत्तर देण्याचे सांगितले आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे भडकलेल्या बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. केंद्र सरकारचा आपल्याला आणि आपल्या समर्थकांना मारण्याचा कट असल्याचे बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करत केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या नोटिशीबद्दल त्यांनी कोर्टाचे आभारही मानले आहे.

close