लोकपाल बिलाच्या मसुद्यावर सरकारचा वेळकाढूपणा – अण्णा हजारे

June 6, 2011 10:21 AM0 commentsViews: 1

06 जून

लोकपाल बिलाच्या मसुद्यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकपाल बिलाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. अण्णांनी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

30 जूनपर्यंत बिलाचा मसुदा तयार करायचा आहे. पण अजून मुख्य मुद्देही ठरले नाहीत. यावरूनच सरकार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे.

दरम्यान लोकपाल बिलासंबंधी आज होणार्‍या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे नागरी समितीच्या सदस्यांनी जाहीर केलं आहे. पण तरीही सरकार बैठक घेणार असल्याचे सरकारी सुत्रांकडून समजतंय.

लोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्यासंदर्भाच्या बैठकीचे व्हिडिओ शुटिंग करण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. जोपर्यंत सरकार मागणी मान्य करणार नाही.

तोपर्यंत कुठल्याच बैठकीला हजर राहायचं नाही असं सिव्हिल सोसायटीचं म्हणणं आहे. पण नागरी समितीचे सदस्य आले नाहीत तरीही सर्व बैठका होतील असा सरकारचा मनोदय असल्याचं समजतं आहे.

close