नामांतर प्रश्नी सेनेची तलवार म्यानात !

June 6, 2011 10:50 AM0 commentsViews: 2

06 जून

मुंबईतील दादर स्टेशन नामांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निर्माण झालेला वाद थांबवण्याचे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पत्र काढून हे आवाहन केलं आहे. दादर स्थानकाच्या नामांतर प्रश्नी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घेतली. त्यामुळे वाद थांबवा आणि सगळ्यांनी काँग्रेस विरोधात एकत्र यावं असं आवाहन करत बाळासाहेब ठाकरे यांनी वादावर पडदा घातल्याचं जाहीर केलं.

close