काँग्रेस प्रवक्ते व्दिवेदींवर बूट उगारला

June 6, 2011 12:03 PM0 commentsViews: 1

06 जून

बाबा रामदेव यांच्यावर कारवाईनंतर दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन व्दिवेदी आणि मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने व्दिवेदींना प्रश्न विचारला याचं उत्तर व्दिवेदींनी दिल्यानंतर सदरील व्यक्तींने रागात येऊन आपला बूट काढून व्दिवेदी यांच्याकडे पळत मंचावर गेला. आणि व्दिवेदीजवळ जाऊन त्यांच्यावर बूट उगारून काही तरी पुटपुटत होता. प्रसंगावधान राखून काँग्रेस समर्थक आणि सुरक्षा रक्षकांनी पकडून चांगलाच चोप दिला.

सुनिल कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. आपण दैनिक नवसंचार या दैनिकाचे पत्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. हा व्यक्ती राजस्थानच्या झुनझुनू इथंला रहिवाशी आहे असं सांगण्यात आलं आहे. यासंपूर्ण प्रकरणानंतर व्दिवेदी यांनी हा सगळा सुनियोजित कट होता असं मत व्यक्त केलं आहे.

कोण आहे सुनील कुमार ?

- आपण पत्रकार असल्याचा सुनील कुमार याचा दावा – राजस्थानमधल्या झुनझुनूमधल्या नवसंचार पत्रिकेचा पत्रकार – त्यापूर्वी सुनील कुमार प्राथमिक शाळेत शिक्षक – सिकारमधल्या विद्या भारती पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजीचा शिक्षक होता – सुनील कुमारचा स्वभाव आक्रमक, शाळेच्या प्रिन्सिपलचा दावा

close