मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत सर्वपक्षीय बैठक

November 12, 2008 5:01 AM0 commentsViews: 1

12 नोव्हेंबर, मुंबईसोमवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली होती. त्यावेळी निमंत्रणच मिळालं नसल्याचं कारण विरोधी पक्षांनी पुढे केलं होतं. आता मात्र आज होणार्‍या बैठकीची निमंत्रणं मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना पाठवली आहेत. त्यामुळं आज मंत्रालयात होणार्‍या या बैठकीला शिवसेना आणि भाजप हजर राहण्याची शक्यता आहे. त्यात मराठी-अमराठी वादावर पंतप्रधानांना भेटून काय निवेदन द्यायचं याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.' मराठीबद्दल कोणाचे विरोध असण्याचा प्रश्नच नाही. मराठी पाट्या लावण्याचा निर्णय असेल की मराठी मुलांना नोकर्‍या देण्याचं, हे सर्व निर्णय याआधीच घेण्यात आले आहेत. पण त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि महाराष्ट्रातील परप्रांतीयांना सुरक्षा पुरवणं हे पण सरकारचं काम आहे ', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

close