औरंगाबादमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी

June 6, 2011 1:43 PM0 commentsViews: 2

06 जून

औरंगाबादेत प्लॉटच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अरूण मुगदिया यांच्या औरंगाबादेतील घराचे बांधकाम सुरू असताना कंत्राटदार आणि त्यांच्या शेजार्‍यांशी वादावादी झाली.

त्यातून शेजारी राहत असलेले उपअभियंता कृष्णा वाघ यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर वाघ यांच्या निकटवर्तीयांनीही कंत्राटदार आणि कामावरील एकाला मारहाण केली. या तिघांनाही सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र डॉक्टरांनी याप्रकरणी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. या घटनेनंतर सरकारी रूग्णालयातही गोंधळ झाला.

close