अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांचे हाल

June 6, 2011 3:00 PM0 commentsViews: 5

06 जून

अपुर्‍या खत पुरवठ्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना कपाशीचं हवं ते बियाणं मिळत नाही. शिवाय व्यापार्‍यांकडून चढ्या भावाने बियाणांची विक्री होत असल्याने शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे. पावसाचं दमदार आगमन होऊनही राज्याच्या कृषी विभागाचे नियोजन फसल्याचा फटका मात्र शेतकर्‍यांना बसत आहे.

औरंगाबादमध्ये बियाणं आणि खतांच्या दुकानात सध्या शेतकरी हवं ते बियाणे मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. पण काही बियाणांचा केवळ पंधराच टक्के पुरवठा झाला आहे. त्

यानंतर शेतकरी पसंती देत असलेलया बियाणांचा अवघा तीस ते चाळीस टक्केच पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पसंती नसलेली बियाणचं खरेदी करावी लागणार हे उघड आहे. टंचाई असलेल्या बियाणांची चढ्या भावाने विक्री होत असल्याने शेतकरी संतापले आहे. त्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

close