राज्यभरात मान्सूनचं दमदार आगमन

June 6, 2011 9:05 AM0 commentsViews: 2

06 जून

राज्यात मान्सूनचं दमदार आगमन झालं आहे. पूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकपर्यंत मान्सून दाखल झाला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली. पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना कोकणात सुरुवातही झाली.

तर मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्याला चांगलंच झोडपले आहे. पावसात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर 16 जनावरंही बळी पडली आहे. पावसामुळे मुक्ताईनगर, रावेर आणि यावल या तीन तालुक्यातल्या दीड हजार हेक्टरवरील केळीचं पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू केले आहे.

close