स्पेक्ट्रम प्रकरणी मारन पुन्हा अडचणीत

June 6, 2011 2:16 PM0 commentsViews: 1

06 जून

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयने आज एअरसेलचे संस्थापक सिवसंकरन यांचा जबाब नोंदवला. यावेळी सिवसंकरन यांनी सध्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांचं नाव घेतलं.

एअरसेलमधील आपल्या मालकीचे शेअर्स मॅक्सिस कंपनीला विकण्यासाठी मारन यांनीच दबाव आणला असा आरोप त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मॅक्सिस कंपनीच्या मालकाशी मारन यांचे जवळचे संबंध होते.

सिवसंकरन यांनी शेअर्स विकल्यानंतर लगेचच मॅक्सिसला स्पेक्ट्रमचं लायसन्स मिळालं. त्यानंतर मॅक्सिस कंपनीने मारन यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या सन टीव्ही ग्रुपमध्ये 600 कोटी रुपये गुंतवले.

2006 मध्ये मारन दूरसंचार मंत्री असताना हा सगळा व्यवहार झाला. स्पेक्ट्रमच्या लायसन्ससाठी आपण केलेले अर्ज मारन यांनी वारवांर नामंजूर केलं आणि आपल्याला शेअर्स विकायला भाग पाडले असा आरोप श्रीनिवासन यांनी केला.

पण दयानिधी मारन यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहे. आपण एखादा व्यवहार करण्यासाठी कुणावरही दबाव टाकला नसल्याचा दावा मारन यांनी केला आहे.

close