बाबांवर कारवाई योग्य – पंतप्रधान

June 6, 2011 3:20 PM0 commentsViews: 2

06 जून

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. आंदोलन अशा पद्धतीने चिरडणे दुदैर्वी आहे. पण दुसरा उपायच नव्हता असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सरकार अतिशय गंभीर आहे.

पण तो तत्काळ मिटवण्यासाठी सरकारकडे जादूची कांडी नाही असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दरम्यान रामदेव बाबा आणि सरकार आणि काँग्रेस यांच्यातील युद्ध आता चांगलंच तापलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल केला. खरा सत्याग्रही महिलांचे कपडे घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही अशी खोचक टीका त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर केली.

काँग्रेसने पंतप्रधान मनमोहन सिंग यांचंही समर्थन केलंय. मनमोहन सिंगांकडे बोट करण्याचा कुणालाही अधिकारी नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

close