शिवछत्रपतींच्या जयघोषात रायगड दुमदुमला

June 6, 2011 9:38 AM0 commentsViews: 9

06 जून

रायगडावर आज 338 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा दिमाखात पार पडला. शिवरायांचे 13 वे वंशज कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते राज्याभिषेक करण्यात आला. शालीवाहन शके 1596 ला शिवरायांना राज्याभिषेक करण्यात आला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सार्वभौम राजा मिळाला.

आज होळी माळावरून शिवरायांच्या प्रतिमेची पालखी काढण्यात आली. त्यानंतर या प्रतिमेची पूजा आणि अभिषेक करण्यात आला.यावेळी राज्यभरातल्या पथकांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर केली. शिवराज्याभिषेक समितीने विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत.तर रायगडावर सकाळी मुसळधार पाऊस झाला. धुकं आणि पावसामुळे मंडप उभारण्यासारख्या कामात अडथळे येत होते. मात्र शिवप्रेमींचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

close