सचिन म्हणतो. ‘झाडं लावा झाडं जगवा’ !

June 6, 2011 5:33 PM0 commentsViews: 7

06 जून

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर नेहमीच आघाडीवर असतो. मंुबईमध्ये त्याने पाणी वाचवण्याची जाहिरात केली होती. त्यानंतर आता पुण्यामध्ये त्याने पुढचं पाऊल टाकत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. पुण्यातल्या उंदरी इथं त्याने वृक्षारोपण केलं. झाडं ही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत असं सांगत त्याने प्रत्येकाला झाडं वाचवण्याचं आवाहन केलं.

close