मराठवाडा बॉम्बस्फोटाची फाईल पुन्हा उघडणार

November 12, 2008 5:08 AM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर, मराठवाडासंजय वरकडमालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी राकेश धावडेला मराठवाड्यातल्या परभणी, पूर्णा आणि जालना मशिदींमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला 14 नोव्हेंबरपर्यंत,पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यात झालेल्या बॉम्बस्फोटाची फाईल पुन्हा उघडली जाऊन तपास नव्यानं सुरु होण्याची शक्यता आहे.मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी राकेश धावडेला मंगळवारी, परभणीच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. परभणीमध्ये दोन हजार तीनमध्ये झालेल्या स्फोटातल्या आरोपींना, सिंहगडला स्फोटांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्या सर्व आरोपींना सिंहगडपर्यंत एका वाहनातून नेण्याची जबाबदारी धावडे याच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार धावडेनं मयत हिंमाशू पानसे, मारोती केशव वाघ, संजय व्यंकटेश चौधरी, योगेश देशपांडे यांना सिंहगडपर्यंत पोहोचवलं होतं. त्यामुळेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासानंतर आता नागपूर, नाशिक, नांदेडची लिंक महत्वपूर्ण मानली जात आहे.परभणी बॉम्बस्फोटातला आरोपी मारोती वाघ आणि मयत हिंमाशू पानसे हे दोघे नांदेडमध्ये, एकत्रपणे संघाचं आणि बजरंग दलाचं काम करत होते. हिंमाशूनं गोव्यातही दोन वर्षे काम केलं आहे. त्याचा संबंध राकेश धावडेशीही आला होता. मिथून चक्रवर्तीनं मराठवाड्यातल्‌या स्फोटांसाठी स्फोटक हिंमाशूकडे पाठवली आणि त्यानं मारोती वाघच्या मदतीनं ती वाटप केली. आता या सर्व प्रकरणांची नव्यानं चौकशी होऊन आरोप निश्चित केले जातील.

close