लालबागचा पूल वाहतुकीसाठी खुला

June 6, 2011 4:14 PM0 commentsViews: 2

06 जून

नेहमीच ट्रॅफिकच्या त्रासामुळे मेटाकुटीला येणार्‍या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. सायन ते सीएसटी मार्गावर मुंबईकरांचा बराच वेळ हा ट्रॅफिकमध्येच जातो. त्यापासून मुंबईकरांची काहीशी सुटका करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लालबागच्या फ्लायओव्हरचं आज उद्घाटन झालं.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा नवा पूल लोकांसाठी खुला करून दिला आहे. तब्बल 2 वर्ष यापुलाचे काम सुरू होतं यासाठी 125 इंजिनियर्संनी अहोरात्र मेहनत करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारतमाता- लालबाग असं या पुलाला नाव देण्यात आलं आहे. तसेच मुंबईतला सर्वाधिक लांबीच्या फ्लायओव्हरचा मान ही पटकावला आहे.

लालबाग फ्लायओव्हर

एकूण खर्च – 140 कोटी, लांबी – 2.45 किमी.- डॉ.आंबेडकर रोडवरील पाचवा फ्लायओवर- बांधकाम दोन वर्षात पूर्ण- एकूण चार लेन्- 245 इंजिनिअर्स आणि कामगार- 40 महिन्यांपासून राबले रोज 9 तास

close