पुण्यात सराफ व्यापार्‍यांमध्ये आणि महापालिकेत वाद सुरूच

June 6, 2011 5:47 PM0 commentsViews: 1

06 जून

सोने चांदीवर आकारण्यात येणार्‍या जकातीवरुन पुणे महापालिका आणि सराफ व्यापार्‍यांमध्ये सुरु असलेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीच जकात भरली नाही म्हणून महापालिकेनं सराफ व्यापार्‍यांवर कारवाई केली. त्याविरोधात व्यापार्‍यांनी कोर्टात धाव घेतली.

हा वाद आताही शमण्याची चिन्ह दिसत नाही. मुंबईमध्ये सोने चांदीवरच्या जकातीचा दर आहे शेकड्याला 10 पैसे, सांगलीमध्ये 18 पैसे तर नागपूर, जळगाव मध्येही 10 पैसे आकारले जातात.

पण पुण्यामध्ये मात्र सोने चांदीवर शेकड्यामागे तब्बल 3 रुपये जकात आकारली जाते. त्यामुळेच आता 7 जूनपासून बेमुदत बंद पुकारणार असल्याचे सराफ असोसियेशननं सांगितलं आहे. महापौर मात्र अजूनही चर्चा करण्याचं आश्वासन देत आहे.

close