मालाडमध्ये चार तरुणांची हत्या

June 6, 2011 4:46 PM0 commentsViews: 2

06 जून

मुंबईत मालाडमध्ये चार तरुणांचे मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून या चार तरूणांची हत्या झाल्याचं सांगितलं जातं आहे. कुरार व्हिलेजमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली. चेतन धुळे, गणेश करंजे, भरत कुडले, दिनेश अहिरे अशी चार तरुणांची नावं आहेत.

पैशाच्या वादातून हत्या झाल्याचं संशय व्यक्त करण्यात येतोय. या चौघांचे मृतेह जाळून टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. या चौघांची हत्या करणार्‍यांना अटक करा या मागणीसाठी नागरिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. तर उदय पाठक तरुणानेच ही हत्या केल्याचा आरोप मृत तरूणांच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी त्याच्या घराची तोडफोडकी केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

close