जळगावात पावसामुळे वीजपुरवठा खंडित

June 7, 2011 7:38 AM0 commentsViews: 2

07 जून

पावसाळा सुरु झाला आणि महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसायला लागला आहे. शनिवारी संध्याकाळी पाऊस पडताना शॉर्टसर्किट झाल्याने डीपी जळाली. तेव्हापासून जळगावचा एक भाग पूर्ण अंधारात आहे.

महावितरणकडे चकरा मारुन थकलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर महात्मा गांधी मार्केट भागातील महावितरणच्या कार्यालयातल्या कर्मचार्‍यांना धारेवर धरलं. गुरुवारपर्यंत वीजपुरवठा सुरु होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

close