पोट निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी आमने सामने

June 7, 2011 9:50 AM0 commentsViews: 2

07 जून

मुंबई महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची बोलणी फिस्कटल्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी आता आमने सामने येणार आहेत. वॉर्ड क्रमांक 111(भांडुप),आणि 181 (माहिम) मध्ये ही पोटनिवडणूक होते.

माहिम मध्ये राष्ट्रवादी तर्फे डॉ. मुद्दाफीर लांबे तर शिवसेने तर्फे मिलिंद वैद्य यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून दिपक तलवार यांची उमेदवारी जाहीर झाली.भांडुपमधून राष्ट्रवादी तर्फे सुशीला मंचेकर तर शिवसेनेतर्फे प्रियंका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

यामुळे राष्ट्रवादी मध्ये भांडूपच्या उमेदवारी वरुन धुसफुस सुरु आहे. भांडूपचे राष्ट्रवादीचे खासदार संजय दिना पाटील यांचा सुशीला मंचेकर यांना विरोध आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांची नाराजी दुर करण्यासाठी राष्ट्रवादी भांडुपचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

close