गोव्यात मराठी फिल्म फेस्टिव्हल थाटात

June 7, 2011 9:56 AM0 commentsViews: 2

07 जून

गोव्यामध्ये नुकताच मराठी फिल्म फेस्टिवल पार पडला. बालगंधर्व सिनेमाने महोत्सवाची सुरुवात झाली. तर अडगुळ मडगुळ सिनेमाने सांगता झाली. दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवात एकूण 10 मराठी सिनेमे दाखवले गेले.

त्यात मी सिंधुताई सपकाळ, बाबू बँड बाजा, तार्‍यांचे बेट असे लोकप्रिय सिनेमे दाखवले गेले. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार या फेस्टिव्हलला उपस्थित होते. सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, सचिन खेडेकर, विक्रम गोखले, नितीन चंद्रकांत देसाई अशा अनेक कलावंतानी आवर्जून हजेरी लावली.

close