पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचार नाही – पंतप्रधान

November 12, 2008 5:33 AM0 commentsViews: 5

12 नोव्हेंबर, दिल्लीजागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. पण जोपर्यंत तेल कंपन्यांची नुकसानभरपाई होत नाही तोपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नसल्याचं, पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केलं. चालू आर्थिक वर्षात तेल कंपन्यांना एक लाख अठ्ठावीस कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे.' तेल कंपन्याचं अजूनही नुकसान भरून निघालेलं नाही. त्यामुळे तेलाचे भाव कमी करण्याची ही योग्य वेळ नाही. त्याशिवाय सरकार सबसिडी देण्यासाठी काही मर्यादा पडत आहेत ' असं ते म्हणाले.

close