सचिनने घेतली जवानांची भेट

June 7, 2011 11:33 AM0 commentsViews: 4

07 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदा त्याचा वाढदिवस आयबीएन लोकमतच्या माध्यमातून पुण्यातल्या आर्मी पॅराप्लेजिक सेंटरच्या जवानांबरोबर साजरा केला होता. आणि पुण्यात आलो की पुन्हा तुमच्या भेटीला येईन असं आश्वासनही आयबीएन लोकमतच्या माध्यमातून त्याने जवानांना दिलं होतं.

हे आश्वासन सचिनने तंतोतंत पाळलं. आणि सोमवारी त्याने या पॅराप्लेजिक सेंटरला भेट दिली. पॅराप्लेजिक सेंटरमधील राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचीही सचिनने यावेळी भेट घेतली. त्याचबरोबर अमोल बोरीवाले या अपंग नेमबाज आणि त्याच्या टीमला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी हवी तेवढी मदतही सचिनने देऊ केली आहे. यावेळी जवानांबरोबर बास्केटबॉल खेळाचा आनंदही सचिनने लुटला.

close