पुण्यातील म्युझियमला सचिनची क्लिन चीट

June 7, 2011 12:01 PM0 commentsViews: 4

07 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पुण्याचं नातं अधिकच दृढ होतं आहे. सचिनने पुण्यामध्ये घर घेत पुणेकरांशी नातं जोडलं. आणि आता पुणेकरही सचिनचा आगळा वेगळा गौरव करणार आहेत.

सचिनच्या नावाने पुण्यामध्ये क्रिकेट म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने मांडला आहे. महापालिकेच्या नेत्यांनी यासंदर्भात सचिनची पुण्यात भेट घेतली. सचिननेही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं कळतंय.

या म्युझियममध्ये भारताच्या पहिल्या टेस्ट पासून 2011 पर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतचा प्रवास क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहे. याशिवात या म्युझियममध्ये सचिनच्या कारकिर्दीला वाहिलेलं एक दालनही उभारलं जाणार आहे. यात सचिनची बॅट, बॉल, ग्लोव्हज, हेल्मेट ठेवलं जाणार असून सचिनच्या अनेक विक्रमांची माहितीही यात दिली जाणार आहे.

close