मालाड येथील हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची बदली

June 7, 2011 12:31 PM0 commentsViews: 14

07 जून

मुंबईच्या मालाडच्या कुरार गावातील चार तरुणांच्या हत्या प्रकरणी कुरार पोलीस स्टेशन निरीक्षक मोहन संखे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. नविन सिनिअर पीआय अरुण नलावडे यांनी काल सुत्र हातात घेतली.

मुंबईत मालाडमध्ये चार तरुणांचे मृतदेह काल सापडले होते. पैशाच्या वादातून या हत्या झाल्याचे सांगितलं जातं आहे. कुरार व्हिलेजमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली. 18 ते 22 वयोगटातील हे तरूण आहेत.

चेतन धुळे, गणेश करंजे, भरत कुडले, दिनेश अहिरे अशी चार तरुणांची नावं आहेत. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचे संशय व्यक्त करण्यात येतोय. या चौघांचे मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं आता समोर आलंय. या घटनेला 24 ताल उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मारेकर्‍यांना शोधण्यात यश आलेलं नाही.

मालाडमध्ये हत्या झालेल्या गणेश करंजेची ही पत्नी, कालच त्यांच्या लग्नाला महिना झाला आणि त्याचं दिवशी गणेशच्या हत्येची बातमी समजली. एका सूड नाट्याने तिचा संसार सुरु होण्याआधीचं उधळला.

चेतन धुळे, गणेश करंजे, भरत कुडले, दिनेश अहिरे शनिवारपासून बेपत्ता होते. आप्पापाडा इथल्या डोंगरावर काल त्यांचे मृतदेह सापडले.

उदय पाठकशी त्यांचा पैशांवरुन वाद झाला आणि त्यानंतर उदय पाठकने या चौघांचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप या तरुणांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या हत्याकांडांची माहिती मिळताचं नागरिक संतापले मारेकर्‍यांच्या अटकेच्या मागणी करत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोकोही केला. पण कमावते तरुण गेल्याने त्यांच्या घरांचा आधाराच तुटला. पाणवलेल्या डोळ्यांची फक्त एकच मागणी आहे मारेकर्‍यांना अटक करा.

close