पुण्यात आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना महापालिकेची बससेवा

June 7, 2011 12:54 PM0 commentsViews: 4

07 जून

पुण्यामध्ये हिंजवडी खराडी, हडपसर अशा अनेक भागांमध्ये आयटी कंपन्या वाढत आहे. या कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना ने आण करण्यासाठी प्रत्येक कंपनीने कॅबची सोय केलेली आहे. या कॅब्जमुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण येतो.

तसेच प्रदुषणातही भर पडते. यामुळेच आता या आयटी कंपन्यांना महापालिकेतर्फेच लक्झरी बस पुरवल्या जाणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात एकुण 25 बसेसची ऑर्डर महापालिकेने दिली आहे.

इन्फोसिस,विप्रो अशा अनेक कंपन्यांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी सांगितलं. लक्झरी बस मध्ये एकाच वेळी अनेक प्रवासी प्रवास करु शकणार असल्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होऊ शकेल असंही ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात 25 बसेसची सेवा सुरु करुन त्यानंतर या बसेसची संख्या गरजेप्रमाणे वाढवण्यात येणार आहे.

close