मुक्ताईंची मानाची पालखी पंढरपूरला निघाली

June 7, 2011 12:58 PM0 commentsViews: 3

07 जून

आषाढी एकादशीला पंढरपूरला सर्वप्रथम पोहोचणारी मुक्ताईंची मानाची पालखी मुक्ताईनगरहून निघाली आहे. खान्देश आणि विदर्भातील वारकरी या पालखीत सामील होत असतात. सलग दोनशे दोन वर्षांची परंपरा या पालखीला आहे.

आदिशक्ती मुक्ताईचं लुप्त स्थान म्हणून मुक्ताईनगर जवळील कोथळी गावाची ओळख आहे. आषाढीला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार्‍या सर्व पालख्यांची सुरुवात मुक्ताईची पालखी निघाल्यावरंच होते.

आषाढीच्या आधी वाकडी गावांत श्री संत ज्ञानदेव आणि मुक्ताई या दोघांच्याही पालख्यांची भेट म्हणजे वारकर्‍यांसाठी भाऊ बहिंणींची भेट हा अपूर्व सोहळा मानला जातो.

close