पुण्यात भीषण अपघातात 5 ठार

June 7, 2011 2:25 PM0 commentsViews: 2

07 जून

पुण्यात निगडी इथं मर्सिडीज कार आणि पाण्याच्या टँकरच्या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती विमल जैन यांचा समावेश आहे. तर उद्योगपती रामकुमार सप्रे यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातल्या सर्व जखमींवर निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं जाणार्‍या मर्सिडीज कारला विरूध्द दिशेने येणार्‍या पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात मर्सिडीज कारचा टँकरच्या खाली येऊन चुराडा झाला. तर शेजारून जाणार्‍या दुचाकी ही या अपघातात सापडली.

या अपघात मर्सिडीजमधून जाणारे उद्योगपती विमल जैन आणि दुचाकीवरून प्रवास करणार्‍या दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणार्‍या कारला धडकला. या अपघात महापालिकेचा कर्मचारी लक्ष्मण ठाकर, हौसाबाई ठाकर, जैन यांचा ड्रायव्हर महेंद्र गवई, संपत इंगळे यांचा मृत्यू झाला. तर टँकर चालक उत्तम कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close