पुण्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव फेटाळला

June 7, 2011 3:28 PM0 commentsViews: 1

07 जून

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तब्बल एक लाख 75 हजार अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्ेा हे बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य-सरकारकडे पाठवला होता परंतु हा प्रस्ताव नगरविकास खात्याने फेटाळला.

या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याच्या कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचे पत्रही महापालिकेला दिले आहे. दरम्यान उल्हासनगरच्या धरतीवर पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केल्याचे महापौरांनी सांगितले आहे. पण महापालिकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम हा निर्णय दिल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.

close