काश्मिरमध्ये अतिरेक्यांना आयएसआयने पुरवला शस्त्रसाठा – राणा

June 7, 2011 6:00 PM0 commentsViews: 2

07 जून

26-11 मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा यांनं काही खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. काश्मिरात घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय शस्त्रसाठा पुरवायची अशी माहिती त्याने दिली आहे.

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने राणाची चौकशी केली. त्यात त्यानं ही माहिती दिली आहे. 18 ऑक्टोबर 2009 रोजी झालेल्या या चौकशीचा व्हिडिओ आज अमेरिकेने प्रसिद्ध केला आहे.

तपास अधिकारी : लष्कर-ए-तोयबाकडून मिळालेल्या इतर कोणत्या प्रशिक्षण शिबिराबद्दल हेडली आणि तुमच्यामधे कधी चर्चा झाली होती का?राणा: इतर म्हणजे?तपास अधिकारी : आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की, हेडलीचा लष्कर-ए-तोयबाच्या इतर कारवायांमधे सहभाग होता का?राणा: तो त्यांच्या बरोबर बसायचा आणि गप्पा मारायचा. पण काश्मीरविषयी बोलताना तो खूप भावूक व्हायचा. त्यावेळी त्याचं ट्रेनिंग सुरू होतं.तपास अधिकारी : डेविड हेडली लष्कर-ए-तोयबाबरोबर बराच काळ होता…जवळ जवळ 5-6 वर्ष होता तो?राणा: हेडलीच्या मते तो लष्कर-ए-तोयबाचाच एक भाग होता. तपास अधिकारी : तो 5 ते 6 वर्ष लष्कर-ए-तोयबाबरोबर होता, हे तो तुम्हाला कधी बोलला होता का?राणा : त्याचा अजूनही त्यांच्याशी संपर्क आहे. तपास अधिकारी : हेडलीला तिथं ट्रेनिंगही मिळालं होतं ?राणा : हो… तपास अधिकारी : त्याच्याजवळ बंदुका, शस्त्रसाठा होता?राणा : नाही… बंदुका नव्हत्या. पण ही काश्मीरच्या स्वातंत्र्याची लढाई असल्यामुळे आयएसआयनं शस्त्रास्त्रं पुरवली होती. तपास अधिकारी : याचा अर्थ हेडलीनं आयएसआय आणि शस्त्रांचा उल्लेख केला होता?राणा : हो. त्यानं उल्लेख केला होता. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी आयएसआयने त्यांना शस्त्रास्त्रं दिली होती.

close