जळगावमध्ये रंगतंय खास ‘ बनारसी ‘ पान

November 12, 2008 5:43 AM0 commentsViews: 4

12 नोव्हेंबर, जळगावप्रशांत बागमनसेच्या मराठी-अमराठी आंदोलनाचं लोण महाराष्ट्राबाहेरही पसरलंय, पण जळगांवाला मात्र त्याची झळ लागलेली नाही. अनेक वर्षांपासून इथं राहणा-या उत्तरभारतीयांना ही मायभूमीच वाटते. मराठी लोकांना ते भावाप्रमाणेच मानतात. जळगावच्या खान्देश मिल कॉम्पलेक्स मधलं ' पानवाला ' नावाचं दुकान उत्तरप्रदेशातल्या ठाकूर कुटुबीयांच्या मालकीचं आहे. हे दुकानं या भागात खूप लोकप्रिय आहे. तब्बल बावीस वर्षांपूर्वी ते आपलं घरदार सोडून जळगांवला आले. आता महाराष्ट्र हेच त्यांना आपलं घर वाटतं. इथल्या सर्व उत्सवांत ते नेहमी सहभागी होतात. मनसेच्या आंदोलनानंतर परिस्थिती चिघळल्यानं त्यांनीही महाराष्ट्र सोडून पुन्हा मूळ गावी जाण्याची तयारी केली होती. पण त्यांना जळगावातल्या मराठी बांधवांना थांबवून घेतलं.' महाराष्ट्र हीच माझी ओळख बनली आहे. मी इतके दिवस महाराष्ट्रात राहिलो आहे की गावापेक्षाही इथेच माझे जास्त मित्र आहेत. असं या दुकानाचे मालक रणजितसिंग ठाकूर यांनी सांगितलं. 'राज ठाकरेंच्या आंदोलनानं सुरु झालेला वाद थांबावा असंच महाराष्ट्रातल्या इतर लोकांप्रमाणे जळगावकरांनाही वाटतंय हेच यानिमित्तानं स्पष्ट झालंय.

close