नवीन स्कायवॉक बांधणार नाही एमएमआरडीएचे घोषणा

June 7, 2011 4:39 PM0 commentsViews: 7

07 जून

रेल्वे स्थानाकांजवळ होणारी गर्दी तसेच रस्तांवर होणार गर्दी यांचा मार्ग मोकळा होण्यासाठी मोठा गाजावाज करत उभारलेले स्कायवॉक आता यापुढे मुंबईत उभारले जाणार नाही अशी घोषणा एमएमआरडीएने केली आहे. आतापर्यंतचे स्कायवॉक हे प्रायोगिक तत्वावर बांधले जात होते. या स्कायवॉकच्या उपयोगाचा आढावा घेणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना यांनी दिली आहे.

शहराच्या कित्येक भागात कोट्यावधी रुपये खर्चकरून स्कायवॉक उभारण्यात आले आहे. पण याचा फायदा काही मोजक्याच ठिकाणी झाला आहे. बर्‍याच ठिकाणी स्कायवॉकचा फायदा आबाल वृध्दांना कमी प्रेमीयुगुलांना झाला आहे. तर स्कायवॉकची उंची जास्त असल्यामुळे वृध्दांनी सपशेल पाठ फिरवली आणि हे होण साहजिकच होतं. आता एमएमआरडीएने आता स्कायवॉक न उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांचा किती फायद्याचा ठरतो हे पाहणे गरजेचं ठरलं.

close