पुण्यात सराफ व्यापार्‍यांचे आंदोलन मागे

June 7, 2011 5:29 PM0 commentsViews: 7

07 जून

पुणे महापालिका सोन्या-चांदीवर आकारत असलेल्या जकातीवरुन सराफ असोसिएशनं पुकारलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. पुणे महापालिका सध्या शेकड्यामागे 3 रुपये जकात आकारते. इतर शहरांमध्ये शेकडयामागे दहा ते 18 पैसे आहेत. ही जकात रद्द करावी या मागणीसाठी सराफ व्यपार्‍यांतर्फे बेमुदत बंद पुकारण्यात आला होता.

आज सकाळी सोन्यामारुती चौकापासून सराफांनी मोर्चा काढला. त्यानंतर महापालिकेसमोर सराफांनी धरणं आंदोलन केलं. महापौर मोहनसिंग राजपाल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी सराफांची भेट घेतली.

जनरल बॉडी मिटींग मध्ये पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा करुनच जकातीसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल तोपर्यंत सराफांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती त्यांनी सराफांना केली.

त्यानंतर एक महिन्यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. एक महिन्याच्या आत पालिकेने जकात कमी केली नाही तर आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा सराफ असोसिएशनं दिला आहे.

close