एमसीएची निवडणूक शरद पवार लढणार नाही ?

June 8, 2011 10:19 AM0 commentsViews: 2

08 जून

मुंंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएची निवडणूक शरद पवार लढवणार नाही. आयबीएन लोकमतला अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून शरद पवार एमसीएचे अध्यक्ष आहेत.

पण यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक पवार लढवणार नसल्याचे कळतंय. या पदासाठी एमसीएचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख उत्सूक आहेत. त्यामुळे विलासराव विरुद्ध शरद पवार असा सामना रंगतो का याची अनेकांना उत्सूकता लागली होती. पण या निवडणूक रिंगणात पवारांनी न उतरण्याचं ठरवल्यानं विलासराव देशमुख विरुद्ध दिलीप वेंगसरकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

close