बाबांनी 58 लाखांची स्टॅम्प ड्युटी चुकवली !

June 7, 2011 5:39 PM0 commentsViews: 4

07 जून

काळ्या पैशांविरोधात रणशिंग फुंकणार्‍या बाबा रामदेव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. आएबीएन नेटवर्कच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागलेत. या पुराव्यांवरून सिद्ध होतंय की बाबा रामदेव यांनी स्टॅम्प ड्युटी चुकवली आहे. ती ही एक दोन नाही तर तब्बल 58 लाख रुपयांची. उत्तराखंडच्या अधिकार्‍यांनी याबाबात बाबांना 16 वेळा नोटिस बजावली आहे.

एवढंच नाही तर हरिद्वारच्या शेतकर्‍यांची सुपिक जमीन बाबांनी हडपल्याचाही आरोप आहे. ही जमीन शेतकर्‍यांनी दान दिल्याचे बाबांचे म्हणणं आहे. पण इथल्या शेतकर्‍यांनीच बाबांविरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. शेतकर्‍यांचा आरोप आहे कि ही जमीन हडपण्यात आली आहे.

तर दुसरीकडे बाबा रामदेव यांचे विश्वासू सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्यावर सरकारने नजर ठेवली. बालकृष्ण हे बाबा रामदेव यांचे कोट्यवधींचे व्यवसाय सांभाळतात. त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट्स असल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात आता कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

close