भाजपचं वक्तव्य बेताल – दिग्विजय सिंग

June 7, 2011 5:50 PM0 commentsViews: 27

07 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपमधील वाद चांगलाच रंगला आहे. रामलीला मैदानावर मध्यरात्री झालेल्या पोलिसी कारवाईची तुलना भाजपने जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं वक्तव्य बेताल असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांना स्वामी विवेकानंद यांचे वारस म्हणणार्‍या लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसेच भाजपच्या नेत्यांनी राजघाटवर सत्याग्रदरम्यान नाचगाणं करून महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

2012 च्या उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीवर डोळा ठेवत दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्री मायावती यांच्यावरही टीका केली आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, दिग्विजय सिंग यांच्या आरोपांना भाजपनंही उत्तर दिलं. पंतप्रधान हे रबर स्टँप आहेत. सोनियांच्या आदेशानुसार ते काम करतात असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केला आहे.

close