साखळीचोरीवर एका पुणेकराचा रामबाण उपाय

June 8, 2011 11:55 AM0 commentsViews: 128

08 जून

पुण्यात साखळीचोरी आणि मंगळसुत्र चोरीच्या घटनांनी गेल्या काही दिवसांत पुणेकर हैराण करून सोडलं आहे. पण यावर उपाय म्हणून एका पुणेकर अवलियाने एक यंत्र तयार केलं आहे. वर्तक असं या व्यक्तीचं नाव आहे.

हे यंत्र गळ्यात घालुन मंगळसुत्र किंवा साखळीला जोडायचं. जेव्हा कोणी गळ्यातून साखळी किंवा मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न करेल तेव्हा या यंत्राचा सायरन मोठ्याने वाजले आणि चोर पकडण्यास मदत होईल. पण यासाठी हे उपकरण मोबाईल सारखं घेऊन मात्र फिरावे लागणार आहे. त्यामुळे सध्या ते जास्त युजर फ्रेंडली करण्याच्या दृष्टीने वर्तक यांचा प्रयत्न सुरु आहे.

close