..तर दयानिधी मारन यांना पद सोडावे लागेल !

June 7, 2011 5:54 PM0 commentsViews: 2

07 जून

ए. राजानंतर आता द्रमुकचे आणखी एक मंत्री 2-जी घोटाळ्यात अडकल्याचं दिसतं आहे. सीबीआयने एफआयआर नाव दाखल केलं तर द्रमुकचे मंत्री दयानीधी मारन यांना वस्त्रोद्योग मंत्रालय सोडावे लागेल असे संकेत पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.

दयानिधी मारन माजी दूरसंचार मंत्री आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या एअरसेल-मॅक्सिक कराराची सीबीआय चौकशी करतंय. एअरसेलचे संस्थापक सिवसंकरन यांनी मारनवर गंभीर आरोप केले आहे.

एअरसेलमधील आपल्या मालकीचे शेअर्स मॅक्सिस कंपनीला विकण्यासाठी मारन यांनीच दबाव आणला असा आरोप त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मॅक्सिस कंपनीने मारन यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या सन टीव्ही ग्रुपमध्ये 600 कोटी रुपये गुंतवले.

2006 मध्ये मारन दूरसंचार मंत्री असताना हा सगळा व्यवहार झाला. आता याबाबत संयुक्त संसदीय समिती मारन यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. शिवाय 1999 ते 2009 दरम्यानच्या सर्वच दूरसंचार मंत्र्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

close