अल्वांचा राजीनामा स्वीकारला

November 12, 2008 5:50 AM0 commentsViews: 3

2 नोव्हेंबर, दिल्लीकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गार्रेट अल्वा यांचा सरचिटणीसपदाचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला आहे. अल्वा या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या पक्ष प्रभारी होत्या. महाराष्ट्रासाठी त्यांच्याजागी आता संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टनी यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, मेघालय, मिझोराम आणि नागलँडचा कार्यभार ऑस्कर फर्नांडीस, पंजाब आणि छत्तीसगड मोहसिना किडवई आणि हरिणाचा कार्यभार मोतीलाल व्होरा यांच्याकडं सोपवण्यात आलाय. कर्नाटक निवडणुकीत तिकीट-विक्री झाल्याचा आरोप अल्वा यांनी केला होता. त्याबाबत पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ए. के. अन्टनी यांच्याकडं अल्वा यांनी स्पष्टीकरण द्यावं, असे आदेश देण्यात आले आहेत.

close