अण्णा हजारे उपोषणाचे नाटक करत आहे – नारायण सामी

June 8, 2011 12:06 PM0 commentsViews: 4

08 जून

राजघाटावर अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या एक दिवसाच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. पण आता या आंदोलनाचा धसका केंद्राने चांगलाच घेतला आहे. त्यामुळेच अण्णा हजारे लोकपाल विधेयकाबाबत गंभीर नाहीत असा आरोप पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी केला आहे. अण्णा हजारे यांचे उपोषणाचे नाटक करत असल्याचा आरोप नारायण सामी यांनी केला आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांचा वापर भाजप करत असल्याचा आरोपही सामी यांनी केला.

close