हसन अलीची पासपोर्ट खटल्यात चौकशी

June 8, 2011 12:15 PM0 commentsViews:

08 जून

कोट्यावधीचा कर चुकवणार्‍या हसन अलीची 2008 च्या पासपोर्ट खटल्यात चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात चौकशी करायला सेशन कोर्टाने वरळी पोलिसांना परवानगी दिल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे.

या केसमध्ये हसन अलीला जानेवारी 2009 मध्ये जामिन मिळाला होता. आज वरळी पोलिसांनी अलीची गुरवार आणि शुक्रवारी चौकशी करण्यासंदर्भात कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. वरळी पोलिसांचे एक पथक आर्थर रोड जेलमध्ये जाऊन त्याची चौकशी करणार आहे.

close